शहरातील नवीन सुरुवात आणि गावच्या आठवणी

Romance 21 to 35 years old 100 to 300 words Marathi

Story Content

नमस्कार, माझं नाव राजेश उर्फ राजू. मी घेऊन आलोय एक भन्नाट स्टोरी, जी वाचून नक्कीच मजा येईल! तर चला सुरुवात करूया!
माझे काका काकी शहरात राहतात. त्यांना मूलबाळ नाही, त्यामुळे ते मला खूप जीव लावतात. नेहमी मला ते शहरात ये असं म्हणत असतात, पण मी जॉबला असल्यामुळे मला शहरात जाता येत नाही. परंतु सध्या मी जॉब सोडला होता, नवीन जॉबच्या शोधात होतो आणि जोपर्यंत दुसरा जॉब मिळत नाही तोपर्यंत मी काका काकींकडे राहण्याचं ठरवलं. मी काका काकींकडे जाण्यास तयार झालो.
मी काकींच्या दाराची बेल वाजवली. काकींने दार उघडले, मला मिठी मारली व 'माझ्या राजा, आलासं? ये आता मध्ये ये,' म्हटल्या आणि 'तू फ्रेश हो, तोपर्यंत मी आपल्याला जेवायला वाढते'. काकींने जेवण वाढलं तर आम्ही दोघांनी सोबत जेवण केलं. जेवण झाल्यावर काकीला शेजारच्या जोशी काकूकडे जायचं होतं. काकी म्हटली, 'मी शेजारच्या जोशी काकूकडे जाऊन येते, तोपर्यंत तू इथेच बस'. मी म्हटलं, काका कधी येतील? तर काकी म्हणाली, 'सहा वाजता ड्युटी संपते, साडेसहा पर्यंत ते घरी येतात'. साडेसहा पर्यंत ते घरी आले.
काका: 'अरे राजु, केव्हा आलास?'
मी: 'काका, मी दुपारीच आलो.'
काका: 'बरं, दादा आणि वाहिनी कश्या आहेत?'
मी: 'सर्वजण मजेत आहे.'
काका: 'बरं, बस मी आत्ताच चेंज करून आलो'. रात्रीची आठ वाजलेत
काका: 'अगं ऐकतेस का? जेवाला काय बनवल?'
काकी: 'डाळ बट्टी'.
काका: 'वा... बरं घेऊन ये लवकर'
काकी: 'हो, लगेच घेऊन आले'.
काका: 'अरे राजू, पण तुला आवडते ना?'
मी: 'हो काका, मला आवडते'.
आम्ही तिघे जेवतंनी गप्पा मारत होतो.
काका हसतच विचारतात: 'अरे राजू, नोकरी कशाला सोडलीस? चांगली होती ना?'
मी थोडं ओशाळून हसत म्हणालो: 'काका, मन लागत नव्हतं... रोज तेच ते काम, आणि सीनियरचा त्रास वेगळाच. म्हणून सोडलं.'
काकी मध्येच म्हणाली: 'हं, बरं केलंस. पण मग पुढे काय? शहरात काही शोधतोयस की गावाकडे परत जाणार?'
मी: 'आत्ताच काही ठरवलं नाही. पण हो, शहरात चान्स असेल तर बघतोय.'
काका माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले: 'शहरात संधी खूप आहेत. इथे राहिलास तर मी आणि तुझी काकी तुला जेवढं जमेल तेवढं मदत करू. काळजी करू नकोस.'
थोड्यावेळाने गप्पा लग्नाकडे वळल्या. काकी: 'आता एक सांग, लग्न कधी करणार? वय होतंय बघ!'
मी हसत म्हटलं: 'अगं काकी, आधी नोकरी ठरवू दे. मग बाकी गोष्टी बघू.'
काका हसून म्हणाले: 'हो, पण गावाकडे कुणी आवडते का? सांग बरं!'
मी लाजत म्हणालो: 'काय हो काका, तसं काही नाही. पण हो, गावातल्या आठवणी मात्र मनातून जात नाहीत.'
गावच्या गोष्टी काढल्या की काकी अगदी रंगून ऐकायला लागली. मी सांगत होतो – बैलगाड्याच्या शर्यती, जत्रा, पोवाडे, भजनं… काकींने हसत म्हटलं: 'अरे वा! किती मस्त गंमत असते गावात.'
तिन्ही बाजूंनी गप्पा सुरू होत्या – गाव विरुद्ध शहर, जॉब विरुद्ध शेती, आणि लग्नाचा विषय नेहमीच मध्ये मध्ये हजेरी लावत होता. हसत-खेळत, गप्पा मारत वेळ कसा गेला कळलंच नाही.